नाशिक:- मकर संक्रातच्या पार्श्वभूमीवर देशासहित नाशिकमध्येही तरुणांनी पतंग उडवण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या येवला भागातही मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यास सुरुवात केली आहे.
या तरुणांकडून बंदी असलेला नायलॉन मांजाचाही वापर केला जात आहे. याच नायलॉन मांजाने पोलीस पाटलाचा घात केला. या नायलॉन मांजामुळे झालेल्या अपघातात पोलीस पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत पोलीस पाटलांना ४० टाके पडले आहेत.
नाशिकच्या येवल्यात दुचाकीवरून घरी परतत असताना नायलॉन मांजाने हडप सावरगावच्या पोलिस पाटलाचा गाल आणि ओठ तसेच कान कापला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पोलिस पाटलाला एकूण 40 टाके पडले आहेत. येवला येथील पोलिसांची आढावा बैठक आटोपून घरी परतत असताना गणेशपुरी शिवारात ही घटना घडली. गेल्या पंधरा दिवसांत येवल्यात नायलॉन मांजाने तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.