भद्रावती(जितेंद्र माहुरे भद्रावती प्रतिनिधी):- शहरातील श्री संत झिंगुजी मठात तीन दिवस चाललेल्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता दिनांक ९ रोजी दुपारी भव्य शोभायात्रेने झाली. श्री संत झिंगुजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा मठातून निघून मुख्य मार्गांवरून फिरत मठात परत आली. बँड, ढोल-ताशे, भजन मंडळे आणि लेझीम पथकांच्या सादरीकरणाने शोभायात्रा भाविकांच्या उत्साहात रंगली.
महोत्सवाच्या सांगतेनंतर गोपालकाल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सव यशस्वी करण्यासाठी पुण्यतिथी महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
संत झिंगुजी महाराज मठात नेत्र चिकित्सा शिबिराचा २०० रुग्णांनी घेतला लाभ
दि. ८ डिसेंम्बर रोजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री संत झिंगुजी मठात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २०० रुग्णांची मोफत तपासणी करून ५० रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रशांत नागपुरे व डॉ. मोनिका नागपुरे यांनी तपासणी करून रुग्णांना योग्य उपचार व मार्गदर्शन केले.
शिबिराला परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. समितीच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.