भद्रावती (जितेंद्र माहुरे भद्रावती प्रतिनिधी):- भद्रावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती च्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामान्य रुग्णालय(NCD TEAM) यांच्या सहकार्याने "आरोग्य शिबिर" यशस्वीरीत्या संपन्न करून समाजपयोगी उपक्रम राबवून बाबासाहेबांना अभिवादन केले.
या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ठ असा प्रतिसाद लाभला त्यात शेकडो पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात BP, शुगर आणि ECG टेस्ट तसेच आयुष्यमान मेडिकल कार्ड काढून देण्यात आले.
या शिबिराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, नागरिकांचे तसेच NCD TEAM चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती भद्रावती च्या वतीने आभार मानले.
या दरम्यान पुढील काळात असे समाजोपयोगी उपक्रम समिती च्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे आश्वासनही समिति च्या पदाधिकाऱ्यांनी येथील नागरीकांना दिले.