चंद्रपूर:- आधीच प्रदुषित चंद्रपूर शहरात हिवाळ्यात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या संचातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण वाढल्याची गंभीर बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी समोर आली आहे.
सुक्ष्म धुलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. नोव्हेबर महिन्यातील ३० पैकीं ३० दिवस प्रदूषित होते.
शहरातील प्रदूषण निर्देशांक ०-५० एक्यूआय गुड निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मात्र असा येथे एकही दिवस नव्हता. ५१-१०० एक्यूआय समाधानकारक निर्देशांक हा सुद्धा एकही दिवस नव्हता., १०१ -२०० एक्यूआय निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो. असे येथे २९ दिवस आढळले तर २०१-३०० एक्यूआय वाईट निर्देशांक असून,असा केवळ एक दिवस (१९ नोव्हेंबर) आढळला.
समाधानाची बाब म्हणजे ३०१-४०० एक्यूआय अतिशय वाईट आणि ४०१-५०० एक्यूआय निर्देशांक हे धोकादायक प्रदूषणाचे मानले जाते. हे प्रदूषण येथे आढळले नाही. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी ३ तर जास्तीत जास्त ८ प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण, २.५,१०. ओझोन,कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, अमोनिया, लीड ह्या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो.