चिमूर:- चिमूर गावालगत असलेल्या कवडशी येथील दिव्यांका श्रीकांत मेश्राम (वय 3 वर्ष रा. कवडशी काल दुपारी 3 च्या सुमारास खेळता खेळता घरापासून काही अंतरावर गावालगत असलेल्या तलावाजवळ गेली व पाण्यात बुडाली.
यावेळी तलावात बैलाला पाणी पाजण्याकरीता गेलेल्या इसमास मुलगी तलावात बुडालेली दिसली. त्याने घरच्या मंडळीना माहिती दिल्यानंतर असंख्य नागरिक घटनास्थळी दाखल होऊन बुडालेल्या चिमुकलीला उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. एकुलती एक लहान चिमुकली बुडाल्याने कवडशी गावात शोककळा पसरली आहे.
घटनेचा तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांचे मार्गदर्शनानुसार आकस्मिक मृत्यु ची नोंद करून सहाय्यक पोलिस निरिक्षक घनश्याम नवघरे करित आहेत.