Pushpa 2 : ‘पुष्पा 2 ने खरंच राडा घातलाय; चंद्रपूर शहरांतील सर्व थिएटर हाऊसफुल्ल

Bhairav Diwase

5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या "पुष्पा २: द रूल" ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल. कोटींहून अधिकची कमाई करून या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट हाऊसफुल्ल असून तिकिटांची कमतरता जाणवत आहे.

दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सर्व प्रेक्षकांना आतुरता होती ती म्हणजेच ‘पुष्पा 2’ची. तसही रिलीजच्या आधीच चित्रपटाने करोडोंमध्ये कमाई केली होती. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या बघता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार हेदेखील निश्चित होतं. त्यामुळे पहिल्या दिवशी हा चित्रपट काय कमाल करतोय हे पाहणे सर्वांसाठीच औत्सुक्याचं होतं. अर्थातच अपेक्षेपेक्षाही ‘पुष्पा 2’ने धुमाकूळ घातला आहे.

चंद्रपूर शहरांतील सर्व थिएटर हाऊसफुल्ल

‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चंद्रपूर शहरांतील थिएटर हाऊसफुल्ल असून काहींना तिकीटही मिळत नाहीयेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. चित्रपट कमाईच्या बाबतीत तो इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचं बोललं जातंय. 

‘पुष्पा 2’ ची ऍडव्हान्स बुकिंग आधीच काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची जवळपास 32 लाख तिकिटं विकली गेली. त्यामुळे रिलीज झा्ल्यानंतर हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमावतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.

येथे करा तुमचं टिकिट बुक:- https://in.bookmyshow.com/buytickets/pushpa-2-the-rule-chandrapur/movie-chan-ET00356725-MT/20241206