earthquake: तेलंगणातील भूकंपाचे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला सौम्य धक्के!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे (earthquake) सौम्य धक्के जाणवले असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगु भागात भूकंप झाला असून, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.



बुधवारी, 4 डिसेंबरला रोजी सकाळी 7:27 वाजता तेलंगणा राज्यातील मुलुगु भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, पोंभुर्णा, सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती आहे.


तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू

गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.


या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.