चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने विरोधकांना चांगलीच चपराक देत 200 च्या वर जागा जिंकल्या, त्यानंतर विरोधकांनी हा विजय ईव्हीएम मशीनचा आहे असा सूर लावत ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन उभारण्याचे संकेत दिले. दिनांक 6 डिसेंबर रोजी चंद्रपुरातून ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. कांग्रेस चे परिवहन विभागाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सचिन रामटेके यांनी ईव्हीएम मशीन हटाव असा नारा देत आमरण उपोषणाला सुरुवात केली.
उपोषणाची सांगता
उपजिल्हाधिकारी पवार, तहसिलदार पवार, कॉंगेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या हस्ते दि. 18 डिसेंबरला सायंकाळी लिंबू सरबत प्राशन करत सचिन रामटेके यांनी उपोषण सोडले. यावेळी कॉंगेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.