चंद्रपूर:- बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात चंद्रपूर येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने न्याय यात्रा काढण्यात आला.
चंद्रपूर येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला होत यात अनेक हिंदू संघटनांना पाचारण करण्यात आले. दि. 18 डिसेंबर दुपारी 02:30 वाजता गांधी चौक येथे सकल हिंदू समाजाचे एकत्रीकरण झाल्यावर न्याय यात्रा गांधी चौक-जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
या मोर्चात बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करीत मोर्चेकरूंनी आक्रोश केला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्याय यात्राची सांगता करण्यात आली. बांगलादेशाचा यावेळी सर्वांनी निषेध नोंदविला. हिंदूधर्मरक्षणासाठी निघलेल्या या आक्रोश मोर्चात मातृशक्ती व तरुणाईने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तरुणाईने भगवा ध्वज तर मातृशक्तीने निषेधाचे फलक हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.