मुल:- अल्पवयीन मुली सोबत शारिरीक संबंध ठेवून गर्भवती झाल्याने डॉक्टरच्या निदर्शनाच येताच डॉक्टरांनी पोलीसांना माहिती दिली यावरून आरोपींचे भींग फुटले असून मुल पोलीसांनी आरोपी दुर्योधन रमेश शिडाम (२३) रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर याला अटक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगी अल्पवयीन असून ती आरोपीच्या काकु ची मेहुणी आहे. ती मुलगी आपल्या मेहूनीला भेटायला जुलै २०२३ मध्ये तिच्या गावी मुल तालुक्यातील हळदी येथे गेली होती. तिथे तिची ओळखी आरोपी सोबत झाली. मोबाईल वर बोलू लागले. ही गोष्ट पीडित मुलीच्या घरच्यांना माहीत झाले त्यावरून मुलगी व आरोपीला समजावून सांगितले होते. काही दिवसानंतर आणखी ते मोबाईल वर बोलू लागले. आरोपीने पीडित मुलीला पळून जाऊन लग्न करू असे सुद्धा म्हंटले होते.
काही दिवसानंतर पीडित मुलीला आरोपीने आपल्या गावी बोलविले. तसेच तू आपल्या गावाला जाऊ नको असे म्हंटले होते. आरोपीच्या आई वडिलांनी तिला ठेवण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने बाजारातून मंगळसूत्र घेऊन पीडित मुलीच्या गळ्यात टाकले व पती पत्नी म्हणून राहू लागले. पती पत्नी म्हणून राहत असतांना आरोपी व पिडीत यांचे वारंवार शारिरीक संबंध झाले. त्यातून पिडीता गर्भवती राहीली अशा पिडीतच्या बयानावरून मुल पोलीसांनी ४८५/२०२४ कलम ३७६, ३७६ (२) (एन) सहकलम ४, ६ पोस्को अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले. पुढील तपास मुल पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहे.