Nylon Manja : पतंगीचा जीवघेणा खेळ! नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा चिरला

Bhairav Diwase

यवतमाळ:- यवतमाळ शहरात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा सर्रासपणे विक्री होत आहे. वाहन चालवीत असताना कटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा गळ्याला गुंडाळल्याने एक जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या भोसा रोड परिसरात दि.२ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. प्रशांत रामचंद्र राऊत असे गंभीर रित्या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्रशांत हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकी वाहनाने रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा गुंडाळल्याने ते रक्तबंबाळ होऊन गंभीरित्या जखमी झाले. दरम्यान ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशांत यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात विक्री होत आहे. असे असतानाही मात्र पोलिसांची कारवाई कुठेही होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.