Nylon Manja : नायलॉन मांज्या विक्री चे रॅकेट चालविणारा पोलीसांच्या जाळ्यात

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दरवर्षी मकर संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर सणापूर्वी व सणनंतर नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवित सण साजर करतात. परंतू त्यामध्ये काही लोक हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा चा वापर पतंग उडविण्यासाठी करतात. त्यामध्ये पतंग तुटून गेल्यावर मांजा रस्त्यावर, आडांवर पडून लटकून राहत असल्यामुळे मोटारसायकलवर जाणारे लोकांचे गळ्याला मांजा लागून गळा चिरण्याचे प्रकार वाढलेले होते. तसेच नागरिकांचे जिवीतास, पर्यावरणास व पशु-पक्षांचे जीवीतास धोका निर्माण झालेला आहे. त्याबाबत असे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणारे लोकांवर छापे घालून कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन केले होते.

दि. 22/12/2024 रोजी 13.00 वा.चे सुमारास पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील सेंट मायकल शाळेजवळ नगीनाबाद येथे ईसम नामे गौरव हेमराज गोटेफोडे हा ईराम लपून छपून नालयॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असीफराजा शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना छापा घालून कठोर कारवाईच्या सूचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केले.

त्यानुसार शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने नियोजनबद्धरित्या सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन गौरव हेमराज गोटेफोडे याचे नगीनाबाद येथील आष्ठविनायक पतंग सेंटर या दुकानावर छापा घालून दुकानाची झडती घेतली असता त्याचे दुकानात मराहाष्ट्र शासनाने प्रितबंधित केलेला व मानव व सजीव पशु पक्षी यांचे जिवीतास धोका निर्माण करणा-या नायलॉन मांजाचे 1,23,800/- रूपये किंमतीचे एकूण 104 बंडल जप्त केले असून त्याचेविरूद्ध रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन व मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देबाजी नरोटे, हिमांशु उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार डेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुष्पलबार आमित ब्ल्युटी साखरे व पथकाने यांनी केली आहे.

चंद्रपूर शहरातील नागरिकांना अवाहन करण्यात येते की, अशा मानवी आरोग्यास व पर्यावरणास घातक असणा-या मांजाची कोठे विक्री होत असल्यास पोलीस स्टेशन रामनगर येथे संपर्क करावा.