Rahul Narwekar: राहुल नार्वेकर पुन्हा आले, विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड

Bhairav Diwase


मुंबई:- विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.


त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.