Student Death: विद्यार्थ्याने पेपर लिहिता लिहिताच घेतला जगाचा निरोप…

Bhairav Diwase

बीड:- वर्गात पेपर लिहिता लिहिता एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीएससची परीक्षा देताना परीक्षा कक्षातच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या के एस के महाविद्यालयात घडली. सिद्धार्थ राजेभाऊ मासाळ (वय २४) असे मृत परीक्षार्थी विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा सुरू असताना अचानक हा विद्यार्थी कोसळला. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला.

बीड शहरातील सावरकर महाविद्यालयात सिद्धार्थ बीएससी तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्ली येथे अभ्यास करत होता. परीक्षा असल्याने तो बीडमध्ये आला. आज सकाळी बीएससीची परीक्षा के एस के कॉलेजला तो परीक्षेसाठी आला होता परीक्षा देत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शिक्षकांना ही माहिती समजल्याबरोबर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलला घेऊन आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याचे वडील खाजगी गाडीवर चालक आहेत. तर आई एका दुकानात काम करते. अचानक ही घटना घडल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे. शिवाय, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.