जी.आय.एस व आय आर.एस व भूगोलाच्या क्षेत्रातील रोजगार या विषयावर एक दिवसीय चर्चासत्रात व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Bhairav Diwase

चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात भूगोल विभागाकडून पी.एम. उषा. स्कीम अंतर्गत रुसा याद्वारे तज्ञांचे विचार ज्ञान आणि कौशल्य यावरिल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी याकरिता जी.आय.एस व आय आर.एस व भूगोलाच्या क्षेत्रातील रोजगार या विषयावर एक दिवसीय चर्चासत्रात एकूण चार सत्रांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार हे होते तर यावेळी ' 'मार्गदर्शक श्री प्रमुख सुनील चांदेकर ( GIS Remote Sensing CAD ) व श्री राजू निरांजने यांच्यासह भूगोल विभाग प्रमुख डॉ. वनश्री लाखे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. सुनिता बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.

जीआयएस व आय. आर. एस तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की भूगोलातील जीआयएस व आय. आर. एस. तंत्रविज्ञानात हे कार्य करीत आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढ होते याप्रसंगी श्री सुनील चांदेकर व श्री राजू निरांजने यांनी या तंत्रज्ञानाविषयी आपली भूमिका स्पष्ट करून येणाऱ्या काळातील तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे महत्त्व सांगितले, प्राचार्य डॉ. पि. एम. काटकर यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहाने व उपप्राचार्य यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत मान्यवरांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प व शब्दगंधा देऊन सत्कार करण्यात आला.

 आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना डॉ. स्वप्रील माधमशेट्टीवार सर यांनी विद्यार्थ्यांना जीआयएस तंत्राचा आजच्या काळातील प्रत्येक क्षेत्रातील त्याचा उपयोग व महत्त्व सांगितले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वनश्री लाखे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. दिपाली दांडेकर आणि आभार प्रदर्शन प्रा. सिद्धांत कामळे यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद सावकार पोरेडडीवार, कार्याध्यक्ष आमदार श्री. किशोर भाऊ जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर सचिव श्री. प्रशांत पोटदुखं यांनी उपयुक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.