MLA Deorav bhongade: आमदार साहेबांनी साधला चिमुकल्याशी आत्मीयतेने संवाद

Bhairav Diwase

राजुरा:- 6 जानेवारी 2025 ला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे रात्री उशिरापर्यंत कोरपना तालुक्यातील नारंडा येथे एका कार्यक्रमास भेट देण्यास आले होते. तेव्हा नारंडा येथील तीन वर्षीय कु.स्वंराश सचिन काकडे नावाचा एक चिमुकला आतुरतेने दादाची वाट बघत होता. आमदार साहेब येतांच साहेबांनी चिमुकल्याची आत्मीयतेने संवाद साधत त्याला अनेक प्रश्न विचारले स्वरांशने आमदार साहेबांच्या सर्व प्रश्नांचे योग्य उत्तरे दिली.

स्वरांश हा अगदी तीन वर्षांचा असून त्यांचे वडील सचिन काकडे त्याला सामान्य ज्ञानाबद्दल दररोज माहिती देत असतात स्वरांश अगदी मुक्ता ठेवत असतो जसे की आपल्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार विविध देशाच्या व राज्याच्या राजधान्या व आपल्या गावातील विविध व्यक्तींची नावे एकदा सांगितल्यावर अगदी मुखपाट होऊन जातात.स्वरांश चे हे ज्ञान बघून आमदार साहेबांनी त्याचं कौतुक केलं भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.