चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेते पद पटकाविले आहे.
गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन मुला-मुलींची स्पर्धा पोंभूर्णा येथील चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजेते पद खेचून आणण्याकरिता श्रुतिका वानखेडे, सोनिया उपरे, सोनाली झाडे, शालिनी निर्मलकर, सौंदर्या दुधकोहर, योगेश्वरी सिन्हा, दिव्याभारती गडरीया, प्रचीता खोब्रागडे, निकिता धूर्वे, अंकिता लीपटे यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले. तसेच या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांचा संघाने उपविजेतेपद पटकाविले. उपविजेते पद खेचून आणण्याकरिता दर्शन मेश्राम, सुमित घोगरे, सचिन चौधरी, योगेश डांगोरे, आशिष जाधव, पवन आंबेकर, भुमेश रविदास, नवीन कांबळे, रोहित मंडल, रोशन चौधरी यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.
दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंतू डंबारे, निलेश बन्नेवार, कु. नागु कोडापे, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.