वीर शहीद जवान....

Bhairav Diwase

मातृभूमीसाठी गमावून प्राण
त्यांनी वाढवली पोलिसांची शान
बांधवा याची ठेव जरा जाण
त्यांचे वीरत्व आपल्यासाठी महान
लावूनी प्राणांची बाजी
नक्षलवाद्यांची झुकवली मान
शेवटच्या श्वासापर्यंत लढून
गमावले त्यांनी प्राण
या वीरांच मनात
स्मारक बांध छान 
त्यांचे वीरत्व आपल्यासाठी महान 

राक्षसांनाही लाजवेल अशी
अमानुष होती क्रूरतेची धार
दुःखात आकंठ बुडाली कुटुंबे
नव्हता वेदनांना अंतःपार 
या वेदनांसाठी पोलिसा
आयुष्य कर बहाल
त्यांचे वीरत्व आपल्यासाठी महान 

हळहळली सारी जनता
मरण त्यांचे पाहून
शहीद होऊन झाले अमर
गेले हृदयात राहून
असाच हृदयात जप
त्यांच्याबद्दल अभिमान
त्यांचे वीरत्व आपल्यासाठी महान

घेऊन त्यांच्या मृत्यूचा बदला
मिळावी शहिदांच्या आत्म्यास शांती
गर्वाने मग फुलावी
आमच्या जवानांची छाती
ही छाती फुलताना मात्र
 होतात्म्याचें ठेव भान 
त्यांचे वीरत्व आपल्यासाठी महान

पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण 
खाकी वर्दीतील दर्दी कवी