चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे पीएम-उषा योजना-सॉफ्ट कंपोनेंट अॅक्टिव्हिटी अंतर्गत ईमेल राईटिंग वर एक दिवसीय कार्यशाळा पार पाडली. विद्यार्थ्यांचे व्यावसायिक ईमेल संप्रेषण कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांनी भूषविले. त्यांनी आजच्या व्यावसायिक जगात प्रभावी संप्रेषणाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वर्गीय सच्चिदानंद मुनगणटीवार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. संतोष शिंदे यांनी ईमेल लेखनाच्या मूलभूत बाबी, त्यातील प्रगत तंत्रे, आणि प्रभावी ईमेल तयार करण्याच्या पद्धतीवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी हिंदुस्थान पेट्रोलीअमचे अधिकारी श्री. देबाशिष चक्रवर्ती यांनीही सहभागींना संबोधित केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सिमरन कपूर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संकेत शहरे यांनी केले. याप्रसंगी कार्यशाळेचे समन्वयक डॉ. ए.व्ही. धोटे, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. प्रफुलकुमार वैद्य, डॉ. संजय उराडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमर वेरुळकर, देशमुख आणि मडावी यांनी सहकार्य केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.