या सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन आज दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयात करण्यात आले. या सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रशिक्षक श्री महेश देशपांडे यांनी स्वयंसेवाकांना सर्वेक्षण कसा करायचा याचा प्रशिक्षण दिले. हा सर्वेक्षण चंद्रपूरच्या संपूर्ण शहरात करायचा आहे.
हा सर्वेक्षण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहास प्रमुख डॉ. प्रकाश शेंडे, प्रमुख अतिथी सर्चचे जॉईंट डायरेक्टर श्री तुषार खोरगडे, प्रशिक्षक सर्चचे स्टॅटिकल ऑफिसर श्री महेश देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले तर आभार दर्शन मेश्राम यांनी मानले.