Pombhurna News: पोंभुर्णा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध

Bhairav Diwase

स्वछता व पाणी पुरवठा सभापतीपदी दर्शन गोरंटीवार, तर.....

पोंभुर्णा:- पोंभुर्णा नगरपंचायत विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक २५ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता नगरपंचायत सभागृहात घेण्यात आली. नगर पंचायत पोंभुर्णा येथील स्वछता व पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण, शिक्षण या विषय समितीच्या सभापती, उपसभापती निवडणूक पार पडली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार बिनविरोध सभापती, उपसभापती म्हणून निवडून आले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली पोंभूर्णा नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक भाजपाने निवडणूक जिंकली. सदर निवडणूकीत भाजपाचे १०, शिवसेनेचे ४, वंचितचे २ व कॉंग्रेसचे १ असे एकुण १७ नगरसेवक निवडून आले होते. भाजपाला बहुमत मिळाल्याने एक हाती सत्तास्थापन केली. यावेळी झालेल्या विषय सभापती निवडणूकीत सुध्दा भाजपाने सत्ता कायम ठेवली.

आरोग्य स्वछता व पाणी पुरवठा सभापतीपदी दर्शन गजानन गोरंटीवार, महिला बालकल्याण सभापतीपदी नंदा ऋषी कोटरंगे, शिक्षण सभापती पदी शारदा गुरनुले, महिला व बालकल्याण उपसभापतीपदी उषा गोरंतवार यांची अविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार रेखा वाणी, सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून नगरपंचयातचे मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी काम पाहिले.तर कनिष्ठ लिपिक रोशन येमुल्लवार, वासुदेव मडावी, वाघाडे उपस्थित होते.

भाजपाचे नेते उपस्थित 

सर्व नवनियुक्त सभापती यांचे हार पुष्पगुच्छ पेढे भरवून अभिनंदन केले  आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. यावेळी यावेळी हरीश शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष, राम लाखीया संगठन महामंत्री, अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, सुलभा पिपरे नागराध्यक्ष, अजित मंगळगिरिवार उपाध्यक्ष, ऋषी कोटरंगे शहरध्यक्ष, ईश्वर नैताम यांनी सर्व नवनियुक्त सभापती यांचे हार पुष्पगुच्छ पेढे भरवून अभिनंदन केले 
आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. यावेळी दर्शन गोरंटीवार, महेश रणदिवे, संजय कोडापे, नंदा कोटरंगे, शारदा गुरनुले, उषा गोरंतवार, श्वेता वनकर, आकाशी गेडाम, रोहिणी ढोले, भाजपा नेते तुळशीराम रोहणकर, गुरूदास पिपरे आदित्य तुमुल्लवार, राजू ठाकरे उपस्थित होते.