Police: निलंबित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा! लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार

Bhairav Diwase
गडचिरोली:- लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निलंबित पोलिस शिपायाविरोधात गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मनोज सुंदरलाल धुर्वे (३०) रा. आलापल्ली असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी आणि मनोजच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मनोजने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाली असल्याची बाब युवतीच्या लक्षात येताच, तिने गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. मनोज धुर्वेच्या विरोधात बीएनएस ६९ अन्वये गुन्हा दाखल करून, त्याला २४ फेब्रुवारी रोजी अटक केली. न्यायालयाने एक त्याला दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.