मात्र यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार राज्यात येऊनही त्यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. त्यांचे हे सल्य कधी न कधी पुढे येतच आहे. त्यांना मंत्रीपद न मिळाल्याचे दुःख अद्यापही मुनगंटीवार पचवू शकले नाही. गुरुवारी चंद्रपुरातील मोरवा धावपट्टीवर फ्लाईंग क्लब शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी केंद्रिय नागरी विमान वाहतूक मंत्री तथा खासदार राजीव प्रताप रुडी यांची विशेष उपस्थिती होती. त्याच कार्यक्रमात परत एकदा केंद्रीय नेतृत्वासमोर मुनगंटीवारांनी मंत्रीपद न मिळाल्याचे आपले दुःख हसत हसत सर्वांसमोर मांडले.
मेरी कुर्सी छिनी गई, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. ते म्हणाले अयोध्येतील राम मंदिराचा प्रत्येक दरवाजा हा माझ्या विधानसभा क्षेत्रातील लाकडांनी बनला आहे. तुम्ही ज्या नवीन संसद भवनामध्ये बसता त्या संसद भवनातील प्रत्येक दरवाजा हा माझ्यात विधानसभा क्षेत्रातील लाकडांनी बनला आहे. रुढी यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, तुमचे मंत्रीपदाच्या खुर्चीवर जाणे बाकी आहे. माझी तर मंत्रिपदाची खुर्ची छीनली आहे. तरी येत्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या खुर्चीवर बसणार आहेत, ती खुर्ची ही माझ्या क्षेत्रातील लाकडांनी बनलेली आहे. एवढेच नव्हे तर सर्व पंतप्रधान कार्यालय हे येथीलच लाकडांनी बनले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र फ्लाईंग क्लबच्या पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांना मंत्रीपद न मिळाल्याचे दुःख लपविता आले नाही.