चंद्रपूर:- वाढदिवस तर सगळेच करतात परंतु युवा नेतृत्व श्याम बोबडे यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प काही वर्षापासून घेतला आहे. यावर्षी त्यांनी आपला वाढदिवस चंद्रपूर शहर महानगरपालिका झोन क्रं. ०३ येथे कार्यरत असलेल्या घंटा गाडी चालक व सफाई कर्मचारी यांच्या सोबत केक कट करून वाढदिवस साजरा केला सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना उन्हाचा वाढता तडका बघता सर्वांना दुपट्टा व त्यासोबत नाश्ता दिला.
त्यानंतर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळेत जाऊन चिमुकल्यांसह केक कट करत वाढदिवस साजरा केला व त्यांना सुद्धा फ्रुटी वाटप करून त्यांचा आनंद द्विगुनीत केला. या सर्व कार्यक्रमामध्ये बोबडे यांचे समस्त मित्र परिवार, बंधू श्री राहुल जी घोटेकर(माजी नगरसेवक), स्वप्नील जी कांबळे (विशेष कार्यकारी अधिकारी), सुभाष जी आदमने (जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा),विपुल जी कवठे, तेजस जी गाणार, आशिष मासिरकर, आशू गाडगे, अक्षय येरेवार, हर्ष पाटील व समस्त मित्र परिवार तथा शालेय स्टाफ उपस्थित होते.