Bjp join: चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

Bhairav Diwase


चंद्रपूर:- माजी मंत्री तथा आमदार विजयवाडा ठेवा यांचे खंदे समर्थक विलास विकार यांच्यासह ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला खिंडार पडली आहे.


मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश झाला. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी विजय मिळवेल,असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला.


ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आज मंगळवारी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी बावनकुळे बोलत होते.


ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी , नगर परिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार , सुरेश दर्वे यांसह अनेकांचे बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.


यावेळी बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी ह्या सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे लक्ष्य ठेवून भाजपा कार्य करत आहे. भाजपा नेतृत्व आणि कार्यावर विश्वास ठेवूनच मागच्या ५० वर्षांपासून कॉंग्रेसशी जोडलेल्या भैय्याजी कुटुंबातील अशोक भैय्याजी यांचे पुत्र गौरव , विखार , विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक कावळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सामील व्हावे , प्रमुख नेत्यांना सक्रीय सदस्य बनवावे, भाजपा संघटना वाढीचे काम करावे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. पक्ष संघटना तुमच्या सदैव पाठीशी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.