Sudhir mungantiwar: तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा अन् अश्या विचारांचे तुकडे करा

Bhairav Diwase

क्रूरकर्मा औरंगजेबाबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी गौरवोग्दार काढल्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले असून सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनीही अबू आझमीना देशद्रोही ठरवून सभागृहातून निलंबित करावे अशी मागणी केली आहे.


'जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा होता. दारा शुकोहोला मारणारा. त्याचं उदातीकरण होऊ शकतं. आज निर्णय घ्यायला पाहिजे औरंग्याची तुटकी फुटकी कबर फोडण्याचा, जाने जिजिया कर लावला, हिंदू महिलांवर अत्याचार केले त्याच्या संदर्भात आपल्या राजकारणासाठी खुर्चीसाठी असं वक्तव्य कोणी करत असेल तर समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अध्यक्ष महोदय तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा,अन् अश्या विचारांचे तुकडे करा' . असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
 
'त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे. पुन्हा या देशात कोणीही हिंमत करता कामा नये' असे आक्रमकपणे मुनंटीवारांनी म्हटले.