बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती समिती राजुरा तर्फे तहसील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन.

Bhairav Diwase
बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती समिती राजुरा तर्फे तहसील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन.


राजुरा- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राजुरा येथे महाबोधी महाविहार मुक्ती समिती राजुरा तर्फे भव्य आंदोलन करण्यात आले आहे.
या भव्य धरणे आंदोलनाचे नेतृत्व     विजय जुलमे यांनी केले, सकाळी ११वाजता  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतडयाला विजय जुलमे आणि समिती चे सहकारी मालार्पन करून दोन दोन च्या रांगेमध्ये तहसील कार्यालय  धरणे आंदोलन च्या पेंडाल कडे आले, पेंडाल मध्ये येऊन, तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला दिप प्रजलित करून धरणे आंदोलनाची सुरुवात केली, या वेळी बोधगया महाबोधी महाविहार हे ब्रामनांच्या ताब्यातून मुक्त झाले पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या, अशा  घोषणेमुळे तेथील परीसर दणाणून गेला, त्या नंतर काही मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले, विजय जुलमे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बिहार येथील नितिष कुमार सरकारचा निषेध करत असतांना १९४९ बि  टी एस सी कायदा पुर्ण पणे रद्द करण्यात यावा, आणि तेथील महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूना देण्यात यावे, अन्यथा राजुरा तालुक्यात याही पेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा विजय जुलमे यांनी बिहार सरकाला दिला, या मध्ये माॅ महीम राष्ट्रपती आणि भारत देशाचे पंतप्रधान यांनी लक्ष देऊन तेथील महाबोधी महाविहार ब्राह्मणांन पासून मुक्त करून तेथील बौद्ध भिक्खूंना देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले.


देशातील विविध धार्मिक स्थळे  ही त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आलेली असून बुद्धगया येथील  महाबोधी बुद्ध विहार हे मात्र अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही. याकरिता गेल्या ५०  वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि  बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलेले आहे .  तरीही अजूनही शासनाने सदर महाबोधी महाविहार  हे बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही.  ही  बाब अत्यंत चुकीची व संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी आहे. 

सदर महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. या मागणीसाठी भारतातील बौद्ध भिक्षुनी  दिनांक १२ फेब्रुवारी पासून बुद्धगया येथे भव्य असे आंदोलन सुरू केले असून  बौद्ध भिक्षूंच्या सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी  दिनांक ७ मार्चला बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती समिती राजुरा , आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य धरणे आंदोलन करण्यात आले आहे . सदर धरणे आंदोलनात बौद्ध उपासक उपासिका .आंबेडकरी अनुयायानी   राजुरा  येथे  तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी मुरलीधर ताकसांडे, सच्चिदानंद रामटेके, विलास पाटील सर, गौतम देवगडे, इंजि, प्रकाश शेंडे साहेब, ऋषी रायपुरे, किशोर रायपुरे, निवारण कांबळे सर,भिमराव दुर्गे सर,गौतम चौरे साहेब, धर्मु नगराडे, गौतम जुलमे सर, ईश्वर देवगडे,योगेश करमनकर, दिगंबर उमरे,प्रभुदास वनकर विठ्ठल धोटे,नागोराव  पडवेकर,किरणताई खैरे, वंदना ताई देवगडे,पुष्पवर्शा जुलमे, शुभांगी धोटे, रत्नमाला ताई माऊलीकर,रेखाताई वनकर, मंजुषाताई दुपारे,रंजना ताकसांडे, तसेच इतर सर्व महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद झाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम देवगडे यांनी केले,   सदर प्रेस नोट सर्व पत्रकानी आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करावी