मुल:- गत अनेक महिन्यांपासून अवैध धंदेवाले मूल तालुक्यातील जनतेच्या मानगुटीवर बसल्याचे विदारक चित्र गत १५ दिवसांपासून जरा धुसर झाले असून गत पंधरवाड्यात तालुक्यातील अवैध धंदेवालेच दहशतीत वावरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
    मूल तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर रितीने गब्बर झालेल्या व अवैध धंद्यात डाॅन  झालेल्या मंडळींच्या
मानगुटीवर महाराष्ट्र पाेलिस सेवा
(मपाेसे) अधिकारी प्रमोद चौगुले 
यांची धडक मोहीम बसली असून मूल तालुका वासियांच्या मनात पुढील काही काळ तरी सुव्यवस्थेबाबत शंका उरलेली नाही. मपोसे अधिकारी प्रमाेद चौगुले हे तिन महिन्यांकरीता
परिविक्षाधीन अधिकारी म्हणून गत १५ दिवसांपासून अवैध धंदेवाल्यांवर पाेलिसी दंडा फिरवत आहेत. कमीतकमी पुढील अडीच महिने अवैध धंदेवाल्यांना दहशतीतच जगावे लागणार अशी चर्चा तालुक्यात सुरू दिसते. 
      गत ४ महिन्यांत मूल तालुका "रक्तरंजीत तालुका" म्हणून
प्रसिद्धीस आला आहे हे सर्वश्रूत आहे. ज्या क्षेत्रात खुलेआम भाेक्सा भाेक्सी हाेत असते त्या श्रेञात इतर अवैध धंद्यांची पाळेमुळे घट्ट वसलेली असतात व मूल तालुक्यात अशीच परिस्थिती असताना मपाेसे अधिकारी प्रमाेद चौगुले यांच्या गत पंधरवाड्यातील 'अंदर डालाे' माेहिमेने मूल तालुक्यात जरा सुव्यवस्थेची सुरूवात अनुभवायला मिळेल असे जाणकार बाेलताना दिसत आहेत. 
     गत काही महिन्यांपासून 
मूल शहर चरस, गांजा, सट्टा, अवैध दारू विक्री चा ठाेक मार्केट बनला आहे. याशिवाय अवैध रेती, अवैध खनिज वाहतूक, अवैध गाे वाहतूक, 
चाेरी, अवैध प्रवासी वाहतूक संपुर्ण तालुक्यात विस्तारली आहे, मूल तालुक्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये एल. सी. बी. ला पुढे यावे लागले आहे. मूल पाे. स्टे. चा डि. बी. स्काॅट गत अनेक वर्षांपासून काही खास लाेकांच्या दावणीला बांधला आहे का? हा सवाल कायम आहेच. 
    अशा बेकायदेशीर धंद्याचे विळख्यात कायदा व सुव्यवस्था ढासळण्याचे मार्गावर असलेल्या मूल तालुक्याला पुढील काही महिने शांत वातावरणात जगण्याची संधी मपाेसे अधिकारी प्रमाेद चौगुले यांच्या अवैध व बेकायदेशीर धंद्याविराेधी 
कारवाईने मिळण्याची आशा बळावली अशी तालुक्यात चर्चा आहे.


