चंद्रपूर:- भारतीय संघाने तब्बल बारा वर्षांनी चॅम्पियन ट्रॉफी ला गवसनी घातली आहे. तसेच न्यूझीलंडला सपाटून आपटले असून भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत जगाच्या पाठीवर आपलं नाव कोरले आहे. या संपूर्ण विजयामुळे भारत विजयाने दुमदुमून गेला आहे. रोहित शर्माच्या चाणक्य नेतृत्वामुळे भारताने न्युझीलँडला 251 धावात रोखले. तसेच भारतीय संघाने विजयासाठी 252 धावांचा पाठलाग करत न्युझीलँडला घरचा रस्ता दाखवला आहे
🇮🇳
भारताने 252 धावांचे आव्हान सहज पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या अभूतपूर्व विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. चंद्रपूर जिल्ह्यासह शहरात भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी मोठ्या पडद्यावर स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. जिथे अनेक लोकांनी एकत्र येत सामना पाहिला. सामना संपताच विजयाच्या आनंदात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
🇮🇳