Chandrapur: चंद्रपूरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनआयटी राउरकेला पटकावला दुसरा क्रमांक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी ने राउरकेला येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) ला भेट देण्यात आली. त्यात दोन दिवसाचा जिओ मायनिंग फिस्ट २०२५ साजरा करण्यात आला होता. 

चढ-उतारांसह विद्यार्थिने ओरे-अ‍ॅक्ले-क्वेस्ट, गट चर्चा आणि सर्व्हेअर नोड या कार्यक्रमात भाग घेतले होते. कॉलेजची आरसीईआरटी टीममध्ये अमर नागराळे, दौलत बलकी, निखिल अंबुरकर आणि ओमप्रकाश जांगडे यांनी प्रतियोगिता मध्ये भाग घेतला होता. त्यात त्यांनी सर्व्हेअर नोडमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. विभाग प्रमुख ए.के. गोराई सर, प्रोफे. सिंगम जयंतू सर आणि माइन गेट टीमशी संवाद साधण्याचा अनुभव घेतला तसेच मायनिंग विभागातील प्रयोगशाळा बघितले.