Fire News: चंद्रपुरात वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण आग

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर मुल मार्गालगतच्या चंद्रपूर वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण लागल्याची घटना आज रविवारी 3 वाजताच्या सुमारास समोर आली आहे. आगीने रौद्ररूप धारण केला असून आग आटोक्यात आणण्यासाठी वन विकास महामंडळाचे यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत आहे. या गीत जंगलातील मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याचा धोका आहे वर्तविण्यात येत आहे.


आज 16 मार्च रोजी दुपारी चंद्रपूर वनविकास महामंडळाच्या जंगलात लोहारा ते घंटाचौकी भागात भीषण आग लागली आहे. चंद्रपूर ते मूल महामार्ग लगत हा भाग येतो. आगीत खूप मोठ्या प्रमाणात जंगल जळत असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही.