मुंबई:- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभावानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काल विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात काही नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
त्याआधी विधिमंडळ गटनेते म्हणून विजय वडेट्टीवार तर प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली होती.
विधानसभा उपनेते पदी अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून अमित देशमुख, सचिव म्हणून विश्वजीत कदम, प्रतोद शिरीषकुमार नाईक, प्रतोद म्हणून संजय मेश्राम यांची नियुक्ती मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.
विधानपरिषदेत देखील कॉंग्रेसने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विधान परिषद गटनेता म्हणून सतेज पाटील ऊर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून अभिजीत वंजारी, प्रतोद म्हणून राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला आहे.
विधानसभा
अमीन पटेल - उपनेते
अमित देशमुख - मुख्य प्रतोद
विश्वजीत कदम - सचिव
शिरीषकुमार नाईक - प्रतोद
संजय मेश्राम - प्रतोद
विधानपरिषद
सतेज ऊर्फ बंटी पाटील - गटनेता
अभिजीत वंजारी - मुख्य प्रतोद
राजेश राठोड - प्रतोद