यवतमाळ:- पुणे येथून प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे जाणाऱ्या DNR ट्रॅव्हल्सला दारव्हा मार्गावरील इचोरी घाटात आज अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली दरीत पलटली. सुदैवाने झाड आडवे असल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लाडखेड व यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.