चंद्रपूर:- रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अप क ३०६/२०२५ कलम ३०३ (२) बी. एन. एस. गुन्ह्याची उकल रामनगर पोलिसांनी केली आहे. फिर्यादी निर्मल नर्कतचंद्र भंडारी, वय ४५ वर्षे, धंदा ठेकेदारी, रा. जामा मस्जिद समाधी वार्ड चंद्रलोक बिछायत केंद्र चंद्रपूर यांनी १४ एप्रिल २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती.
फिर्यादीनुसार, त्यांच्या घर बांधकामाच्या ठिकाणी मकरंद लॉनजवळ ठेवलेले प्रत्येकी ४,००० रुपये किंमतीचे १९ नग सेंट्रींग प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या चोरीमुळे त्यांचे एकूण ७६,००० रुपयांचे नुकसान झाले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सा., अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख यांनी गुन्हे शोध पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत आरोपी हर्षद उर्फ सेक्सी कालीदास मेश्राम, वय २६ वर्षे, धंदा मजुरी, रा. घुटकाला वार्ड नेहरू स्कुलजवळ मुरसकर यांचे घरी भाड्याने याला १५ एप्रिल २०२५ रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरी केलेले १९ नग सेंट्रींग प्लेट, ज्यांची किंमत ७६,००० रुपये आहे, हस्तगत करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सा., अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख आणि गुन्हे शोध पथकातील सपोनी देवाजी नरोटे, सपोनी हनुमान उगले, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा /२२७३ शरद कुडे, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / ११६५ आनंद खरात, पोहवा / २४५४ प्रशांत शेंद्रे, पोहवा / २४३० लालु यादव, मपोहवा/४६२ मनिषा मोरे, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि / ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि / ७८७ रविकुमार ढेंगळे, पोशि /६३० प्रफुल पुप्पलवार, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, मपोशी ब्लुटी साखरे/२६५३ यांनी केली.