सावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनलची एकहाती सत्ता

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनन्य साधारण महत्व आहे. सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून १७ पैकी १४ जागांवर काँग्रेस समर्थित गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करीत बाजार समीतीवर काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर भाजप समर्थित गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागल्याने भाजपला चांगलाच धक्का बसला. तर ०२ उमेदवार हे अपक्ष निवडून आले आहे.

सावली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते,आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होती. निवडणुकीत विजयी गुलाल उधळण्यासाठी योग्य नियोजन करून विजयी समीकरण रचण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सावली बाजार समितीची निवडणूक काॅग्रेस प्रणित पॅनेलने लढविली होती.

तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदीप गड्डमवार व जि.प.माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली. या अटीतटीच्या निवडणूकीत कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यानी विजय खेचून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याने विजयश्री खेचून आणण्यात यश आले आहे. मागील कार्यकाळात देखील बाजार समीतीवर काँग्रेस गटाचीच सत्ता होती. संचालक मंडळाच्या कार्यावर मतदारांनी विश्वास टाकत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला सत्ता प्राप्त करून दिली आहे.

झालेल्या निवडणूकीचा आज ७ एप्रिल रोजी घोषित करण्यात आला आहे. यात कॉग्रेस समर्थित गटाने १७ उमेदवारांपैकी १५ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. ०२ अपक्ष तर भाजप गटाला केवळ १ जागावर समाधान मानावे लागले असून एकतर्फी पराजय झाल्याने भाजपची चांगलीच हिरमोड झाली.

सावली कृषी उत्पन्न बाजार समीतीतील काँग्रेस पक्षाचे १४ उमेदवार विजयी झाले. त्यात सर्वसाधारण गटातून नितीन गोहने, राजू ठाकरे, नारायण नन्नावरे, हिवराज शेरकी, मधुकर शेंडे, अनिल स्वामी, तर सेवा सहकारी संस्था विमुक्त / भटक्या जमाती मधून प्रमोद दाजगाये, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मधून निखिल सुरमवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाति जमाती मधून अरविंद भैसारे, अडते व व्यापारी गटातून प्रशांत चिटणुरवार, हमाल व मापारी गटातून मारोती सहारे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरडकर व सुनील बोमनवार तसेच सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून नंदा आभारे व कांताबाई बोरकुटे हे सर्व उमेदवार विजयी झालेले आहे. तर भाजपा प्रणित पॅनेलचे सचिन तंगडपल्लीवार, व सर्वसाधारण गटातून अपक्ष उमेदवार राकेश गड्डमवार व नरेश गड्डमवार हे निवडून आले आहेत

सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनन्य साधारण महत्व आहे. सावली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून १७ पैकी १४ जागांवर काँग्रेस समर्थित गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करीत बाजार समीतीवर काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर भाजप समर्थित गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागल्याने भाजपला चांगलाच धक्का बसला. तर ०२ उमेदवार हे अपक्ष निवडून आले आहे.

सावली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते,आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होती. निवडणुकीत विजयी गुलाल उधळण्यासाठी योग्य नियोजन करून विजयी समीकरण रचण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सावली बाजार समितीची निवडणूक काॅग्रेस प्रणित पॅनेलने लढविली होती.

तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदीप गड्डमवार व जि.प.माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली. या अटीतटीच्या निवडणूकीत कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यानी विजय खेचून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याने विजयश्री खेचून आणण्यात यश आले आहे. मागील कार्यकाळात देखील बाजार समीतीवर काँग्रेस गटाचीच सत्ता होती. संचालक मंडळाच्या कार्यावर मतदारांनी विश्वास टाकत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला सत्ता प्राप्त करून दिली आहे.

झालेल्या निवडणूकीचा आज ७ एप्रिल रोजी घोषित करण्यात आला आहे. यात कॉग्रेस समर्थित गटाने १७ उमेदवारांपैकी १५ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. ०२ अपक्ष तर भाजप गटाला केवळ १ जागावर समाधान मानावे लागले असून एकतर्फी पराजय झाल्याने भाजपची चांगलीच हिरमोड झाली.

सावली कृषी उत्पन्न बाजार समीतीतील काँग्रेस पक्षाचे १४ उमेदवार विजयी झाले. त्यात सर्वसाधारण गटातून नितीन गोहने, राजू ठाकरे, नारायण नन्नावरे, हिवराज शेरकी, मधुकर शेंडे, अनिल स्वामी, तर सेवा सहकारी संस्था विमुक्त / भटक्या जमाती मधून प्रमोद दाजगाये, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मधून निखिल सुरमवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाति जमाती मधून अरविंद भैसारे, अडते व व्यापारी गटातून प्रशांत चिटणुरवार, हमाल व मापारी गटातून मारोती सहारे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरडकर व सुनील बोमनवार तसेच सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून नंदा आभारे व कांताबाई बोरकुटे हे सर्व उमेदवार विजयी झालेले आहे. तर भाजपा प्रणित पॅनेलचे सचिन तंगडपल्लीवार, व सर्वसाधारण गटातून अपक्ष उमेदवार राकेश गड्डमवार व नरेश गड्डमवार हे निवडून आले आहेत.