Bachchu Kadu: बच्चु भाऊच्या आंदोलनास यश २२ पैकी १९ मागण्या मंजुर!

Bhairav Diwase


मुंबई:- रायगड येथील दिव्यांगाच्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी बैठक आयोजीत करण्यात आली.

या बैठकी मधे झालेले निर्णय खालीलप्रमाणे
१) २०१६ च्या कलम ८८ नुसार बजेट च्या ५% दिव्यांगावर खर्च करणे अपेक्षित आहे करीता तपासुन अहवाल सादर करणार.
२) स्थानिक स्वराज्य संस्थेतील दिव्यांगाचा ५% निधी खर्च करत नाही करीता हा निधी लेखा परीक्षण मधे घेतल्या जाणार.
३) दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थेसाठी विशेष योजना आखली जाणार.
४) दिव्यांग साहीत्य वाटप करताना रोजगारयुक्त व रोगमुक्त साहीत्य वाटप करण्यात येणार.
५) दिव्यांग रोजगार, उद्योग व स्टौल करता स्वतंत्र धोरण आखणार.
६) आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, कोतवाल , पोलीस पाटील यांच्या भरतीत दिव्यांगाना अधिक १० गुण दिले जाणार.
७) दिव्यांग विद्यापीठा एवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगाच्या शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभारल्या जाणार.
८) मुकबधीरांना १० वी नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार तसेच वाहनपरवाना देण्यासंबंधीत निर्देश देण्यात आले.
९) अंध दिव्यांगासाठी सौफ्टवेअर व अडथळामुक्त शिक्षणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१०) राज्यभर दिव्यांगाचा सर्वेची सुरवात करण्यात आली आहे.
११) एका छताखाली तालुका व जिल्हास्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू करण्यात येणार.
१२) फळबागेसाठी पेरणी ते कापणी पर्यत शेतकऱ्यांना स्वतंत्र योजना कशी अमलबजावणी करण्यात येऊ शकेल याकरिता पंजबाराव कृषी विद्यापीठाला निर्देश देण्यात आले.
१३) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजुरांना लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच ही योजना लागु करण्यात येईल.
१४) शिवकालीन मावळांच्या परीवारातील वंशजांकरीता योजना आखण्यात येईल.
१५) दिव्यांग मानधनवाढीसाठी ६ महिन्याची मुदत मागण्यात आली जर मानधन वाढ नाही झाली तर महाराष्ट्र भर आंदोलन करणार.
१६) बोगस दिव्यांगावर ८ दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
१७) संजय गांधी मानधनाकरीता उत्पन्न मर्यादा ५० हजाराची २ लाख करण्याचे मान्यता देण्यात आली.
१८) अंतरजातीय विवाहाप्रमाणे दिव्यांग व अदिव्यांग विवाहाकरीता २.५ लाख रुपये निधी देण्यात येईल.
१९) दिव्यांग घरकुलाकीता स्वतंत्र योजना तयार करणार.
२०) मयत दिव्यांगाचा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला यामधे ६ कोटी पेक्षा अधिकची कर्जमाफी झाली आहे.
२१) शेतकरी कर्जमाफी करीता नकार दिल्यामुळे कर्जमाफी करीता व दिव्यांगाना मानधन ६००० करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार.