चंद्रपूर:- कामाच्या निमित्त ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये जबरदस्तीने नेऊन कॉफीमध्ये मादक पदार्थ टाकून चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीवर बलात्कार करण्यात आला. याबाबतची तक्रार पीडीतेने रामनगर पोलिसात दाखल केलेली आहे. या घटनेत तीन आरोपींची नावे समोर आली आहेत, ज्यात मुख्तार शाह, नुरानी अहमद गुलाम नबी आणि मुख्तार गुलाम नबी यांचा समावेश आहे.पीडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्तार शाहने आपल्या पत्नीला पीडितेकडे काही काम आहे असे सांगून तिला घरातून नेले.पण वाटेत, पीडितेला घरी नेण्याऐवजी तो तिला 'ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्ट' मध्ये घेऊन गेला.
तिला 'ताडोबा वाइल्ड रिसॉर्ट' मधील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ताडोबा वाइल्ड रिसॉर्ट मधील वेटरने आणलेल्या २ कॉफीपैकी पीडीतेच्या कॉफीमध्ये काही मादक पदार्थ मिसळण्यात आले. ते तिला देण्यात आले आणि नंतर तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
अशी माहिती पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत सांगितली आहे. घटनेनंतर, आरोपी नुरानी अहमद गुलाम नबी आणि त्याचा धाकटा भाऊ मुख्तार गुलाम नबी यांनी पीडितेला धमकी दिली की ती कोणालाही काहीही सांगू नये. भीतीपोटी, पीडितेने घटना लपविली. परंतु सततच्या धमक्यांमुळे, तिने शेवटी तिच्या पालकांना सर्व काही सांगण्याचे धाडस केले आणि त्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस ठाण्याला संपर्क साधला.
पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार असून रामनगर पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांना विचारणा केली असता तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली.