बल्लारपूर:- येथील 'वेकोलि' वसाहतीतील वेकोलिच्या उपव्यवस्थापकाच्या घरी १४ मेच्या रात्री दरोडा टाकण्यात आला होता. पाच आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील तिघेजण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपींकडून ८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन आरोपी आणि तीन विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले. यात मनीष जगदीश रप्तान (१९) रा. साईबाबा वॉर्ड, प्रिन्स ऊर्फ कालू संग्राम बहुरिया (१९) रा. सरदार पटेल वॉर्ड असे आरोपींचे नाव आहे. तर तीन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून सात तोळे सोने, मोबाईल, आठ हजार नगदी चोरून नेल्याची घटना १४ मेच्या रात्री ३:३० वाजताच्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात तपास करून गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.