चंद्रपूर:- आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत रामबाग मैदानाला धक्का लावू नका अशी आक्रमक भूमिका मांडली. विकासकामांना आमचा कधीच विरोध नाही, मात्र लोकशाहीत जनभावनेचा आदर झाला पाहिजे. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
रामबाग मैदान हे केवळ एक मोकळं जागा नसून, नागरिकांच्या सकाळ-संध्याकाळच्या फेरफटका मारण्याचे, खेळाडूंनी सराव करण्याचे आणि मुलांनी खेळण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे इथे जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी तीव्र विरोध केला.
हा विरोध आमदार किशोर जोरगेवार यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पष्ट शब्दांत मांडला आणि नागरिकांच्या भावनांशी एकरूप होत जिल्हा परिषदेची इमारत दुसऱ्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.