चंद्रपूर :- चंद्रपूर येथील सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल ९४.२४ टक्के असुन यात विज्ञान शाखेचा ९८.०६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.१८ टक्के, तर कला शाखेचा ८७.८३ टक्के निकाल लागला आहे.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना चांदीचे नाणे देऊन सत्कार केला. उच्च माध्यमिक परीक्षेत सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेतील मिनल प्रविण बोबाटे हिने ९२.६७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. वाणिज्य विभागामध्ये कु. मुस्कान अमित चंक्रवती हिने ९४.१७ टक्के घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कला विभागात प्रतिक्षा रामदास देवाळकर हिने ८२ टक्के घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविद पोरेड्डीवार यांनी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना स्वतःकडून चांदीचे नाणे देऊन सत्कार केला. त्यांच्याशी संवाद साधत मेहनत नेहमी फळाला येते, हे महाविद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मेहनतीने व चिकाटीने मिळवलेल्या यशासाठी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर यांच्यासह वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी.जे खैरवार, प्रा. प्रमोद कुचनकार, प्रा. शितल कटकमवार, कु.अर्चना मडावी, सौ. शीफाली कुम्मरवार, प्रा. सतिश खोव्ररागडे, प्रा. अनंता मल्लेलवार, प्रा.नितीन पाडेवार, प्रा. नितीन डांगरे, प्रा. आशिष जांबुतकर व प्रा. विक्की पेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशात महाविद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे योगदान ठरल्याचा उल्लेख आवर्जून केला.