भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli)अखेर कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.
कोहलीची पोस्ट नेमकी काय?
निवृत्तीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्टावर विराट एक पोस्ट केली आहे ने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी १४ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा प्रवासात घेऊन जाईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे. कठोर परिश्रम, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्यासोबत राहतात.
मी या फॉरमॅटपासून दूर जातोय ते सोपं नाहीये, पण सध्या ते योग्य वाटत असल्याचे विराटनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मी माझे सर्वस्व दिले आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन असे म्हणत विराटने #269, साइनिंग ऑफ अशा शब्दांच त्याच्या निवृतीच्या पोस्टचा शेवट केला आहे.