कोरपना:- कोरपना-नारंडा-भोयगाव -चंद्रपूर बससेवा सुरू करण्यासंदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या मागणीची दखल घेत अखेर कोरपना-नारंडा-भोयेगाव-चंद्रपूर बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
सदर बससेवा सुरू झाल्यामुळे कोरपना तालुक्यातील कोडशी बु, कोडशी खुर्द, गांधीनगर, हेटी, शेरज बू, शेरज खुर्द, माथा, वनसडी, लोणी, पिपरी, नारंडा, वनोजा, कढोली खुर्द, अंतरगाव, सांगोडा, हिरापूर, विरुर, गाडेगाव, बोरगाव, इरई, भारोसा, भोयेगाव इत्यादी गावातील नागरिकांना फायदा होईल.
कोरपना - नारंडा-भोयगाव-चंद्रपूर बससेवा सुरू झाल्यास कोरपना तालुक्यातील नागरिकांना चंद्रपूरला जाण्यासाठी सोपा व सोयीचा होता. सदर मार्गावर कोरोना पासून एकही बस सेवा सुरू नव्हती ,त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना राजुरा मार्गे फेरा घेऊन जावे लागत आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाया जात होता ,सदर बस सेवा सुरू व्हावी अशी परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक पासून मागणी होत होती.
सदर मागणीची दखल घेत चंद्रपूर वरून नारंडा मार्गे कोरपनासाठी सकाळी ८.३० वाजता व सायंकाळी ५.३० वाजता व कोरपनावरून नारंडा मार्गे सकाळी १०.३० वाजता बस सेवा सुरू करण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगर प्रमुख यांना निवेदन दिले होते.त्याच अनुषंगाने सदर बससेवा सुरू करण्यात आली आहे.
यावेळी तालुक्यातील नारंडा गावात बसचे पूजन करून स्वागत करण्यात आले.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष ताजने, वनोजा येथील सरपंच दिलीप पाचभाई,नारंडा उपसरपंच बाळा पावडे, कढोली खुर्द उपसरपंच विनोद डोहे,उत्तमराव मोहितकर,प्रवीण हेपट,संतोष वांढरे,अनिल चांदेकर,पप्पू पंदिलवार,मंगल खाडे,विनोद पेटकर, प्रमोद शेंडे,आशिष ढुमणे हर्षल चामाटे, रोशन पोटदुखे,भिकाजी घुगुल,गणेश पावडे,निखिल ताजने,मंगल निकोडे, सचिन काकडे,सचिन उरकुडे,मीन्नाथ लांडगे,सुरेश मुद्दलवार, निखिल उपासे,अशोक शेंडे,गणेश मोहूर्ले, यांची उपस्थिती होती.
यावेळी वाहक व चालकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सदर व सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील गावातील प्रवासी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बस सेवा सुरू केल्याबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले.