चंद्रपूरः- एका अल्पवयीन मुलीला जास्तीत जास्त मजुरी मिळवून देतो आणि लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संताप जनक घटना चिमूर तालुक्यातील नेरी येथे उघडकीस आली आहे. नदीम सुलतानी (वय 29) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील नेरी सिरपूर मार्गावर नागपूर येथील एका कंपनीचे मिरचीचे देट खुडण्याचे मागील चार महिन्यापासून सुरू आहे. या ठिकाणी अनेक महिला पुरुष कामावर आहेत. या ठिकाणी सातऱ्यावर मजुरांना मिरची मोजून देणे, हिशोब करण्यासाठी दिवानजी म्हणून नदीम सुलतानी रा. बुलंदशहर उत्तरप्रदेश हा कामावर होता. त्या ठिकाणी कामावर असलेल्या एका अल्पवयीन मुलीला अनेक आमिष दाखवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बुधवारी रात्री दोन वाजताचे सुमारास त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पोलिसांनी माहिती दिली.
पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस.आय. मल्हारी ताळीकोटे आणि सहकारी यांच्या नेतूत्वात घटनास्थळी पोहचून तात्काळ संशयित आरोपी नदीम सुलतानी यालाबी.एन.एस. अंतर्गत कलम 64 ,65,व पोक्सो अंतर्गत 4, 6 कलमांव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली असून पुढील तपास पी एस आय शुभांगी पाटील करीत आहेत.