औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी निविदा व पदभरतीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया राबवा- श्री सुरज ठाकरे

Bhairav Diwase
जय भवानी कामगार संघटनेची मागणी


चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की, औद्योगिक जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
 सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा याकरिता जय भवानी कामगार संघटना ही सातत्याने प्रशासन दरबारी कागदोपत्री पाठपुराव्यासह वेळोवेळी आंदोलन, उपोषण करत आलेली आहे.
 महत्त्वाची बाब म्हणजेच *चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट कंपन्या, कोळसा खाणीसह इतरही औद्योगिक क्षेत्रात कंत्राटी कामांसाठी निविदा प्रक्रिया आणि त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या पदभरतीच्या संधी उपलब्ध संकेतस्थळाद्वारे स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात नाही.* 


 यामुळे जिल्ह्यात नवीन कंपनी  येऊन कामही सुरू करते मात्र कंत्राट संपुष्टात येईपर्यंत स्थानिक बेरोजगार तरुण रोजगार मिळावा या आशेने कंपनीच्या गेटवर फक्त चकरा मारीत अखेर निराश होऊन घरी परतत असतो. आणि  स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार हिरावून बहुतांश परप्रांतीय कामगार हे कंपनीतील कंत्राटदारांच्या मदतीने कंपन्यांमध्ये काम करतांना आढळतात. 


८०% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा याकरिता *जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे* यांनी महाराष्ट्र शासन तथा केंद्र शासन अंतर्गत येत असलेल्या कंपनीतील संबंधित अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पारदर्शकपणे जाहिरात/ माहिती पोहोचवण्याची संकल्पना राबवने बंधनकारक करून निविदा प्रक्रिया आणि त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या आवश्यक पदभरतीच्या संधी उपलब्ध संकेतस्थळाद्वारे स्थानिक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याची प्रक्रिया राबवून स्थानिक कौशल्यवान गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याकरिता माजी *कॅबिनेट मंत्री मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्याकडे आज दिनांक- २५ जुलै २०२५ ला निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


*निविदा आणि पदभरती प्रक्रियेबद्दल श्री. सुरज ठाकरे यांनी केलेली मागणी:-*

१) *निविदा प्रकाशन:-* कंत्राटी कामांसाठी निविदा स्थानिक वृत्तपत्रे, सरकारी संकेतस्थळे आणि संबंधित कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट्सवर नियमितपणे प्रसिद्ध करण्यात यावी.

२) *पदांचे स्वरूप:-* या निविदांमध्ये तांत्रिक, प्रशासकीय, सुरक्षा, स्वच्छता, बांधकाम, उत्पादन इत्यादी क्षेत्रांतील कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांसाठी पदे उपलब्ध करून देण्यात यावी.


३) *अर्ज प्रक्रिया:-* इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमाणपत्रे, अनुभव असल्यास प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांसह ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात द्यावी.

४) *निवड प्रक्रिया:-* लेखी परीक्षा अथवा मुलाखात आणि कौशल्य चाचणी यांच्या आधारे उमेदवारांची निवड करून ८०% स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण राबवावे.

वरील पदभरती प्रक्रियेची पद्धत याचप्रमाणे असताना देखील याची चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित अधिकारी तथा कंपनी प्रशासन अंमलबजावणी करण्याऐवजी नियमबाह्य पद्धतीने परप्रांतीय कामगारांचा भरणा करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे..! अशी खंत यावेळेस श्री. सुरज ठाकरे यांनी वेक्त करत. सदर समस्येचे तात्काळ निवारण करण्याची मागणी केली आहे.