एटापल्ली:- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथे आज सकाळी एका ट्रॅक्टर अपघातात ३८ वर्षीय चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिल शेंडे असे या मृत चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शेंडे हे वाघेझरी येथील रहिवासी असून, शेतीसाठी ट्रॅक्टर चालवण्याचे काम करत होते. आज सकाळी ट्रॅक्टर उलटून त्यांच्या अंगावर पडल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.
अनिल शेंडे हे अत्यंत मेहनती आणि नम्र स्वभावाचे असल्यामुळे गावात लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक निधनाने शेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, शेंडे कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.