सावली:- सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील २० वर्षीय तरुण घरात कुणी नसल्याची संधी साधून राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली. वंश विजय चौधरी (२०) रा. गेवरा खुर्द असे मृत तरुणाचे नाव आहे. वृत्तलिहिपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
शनिवारी वंशचे आई-वडील शेतावर गेले होते. घरी कुणीच नव्हते, हीच संधी साधून वंशने घरातच गळफास घेतला. याबाबतची माहिती मिळताच पाथरी पोलिसां पंचनामा करून शवविच्छेदनासाठी वंशचा मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वंश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली.