Suicide News: "मी आत्महत्या करणार " असे सांगून युवकाने केली आत्महत्या

Bhairav Diwase

सावली:-
मी आत्महत्या करणार' असे नातेवाईकांना सांगून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २९) गेवरा बुज येथे उघडकीस आली. प्रशांत विठ्ठल चौधरी (३२) असे मृतकाचे नाव आहे.


प्रशांत चौधरी याने काही दिवसांपूर्वी 'मी आत्महत्या करणार' असल्याचे नातेवाईकांना सांगितले. परंतु, त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याच्या या धमकीकडे कुटुंबासह कुणीही मनावर घेतले नाही.सोमवारी (दि. २८) कुटुंबाला भनक लागल्यानंतर समजूत त्याची घातली. मात्र, मंगळवारी (दि. २९) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास नजर चुकवून त्याने बकरी पालन शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाथरी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितेश डोर्लीकर, मडावी, कोरे, गायकवाड, खंडाळे, शेंडे, बारेकर आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयाकडे सुपूर्द केले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.