Bear Attack : जंगलात गेलेल्या बाप-लेकावर अस्वलाचा हल्ला

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना गावाजवळच्या जंगलात गेलेल्या बाप-लेकावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अरुण कुपसे आणि त्यांचा मुलगा विजय कुपसे हे दोघे कुड्याची पाने तोडण्यासाठी जंगलात गेले होते. त्याचवेळी एका अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.


अस्वलाच्या या हल्ल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्या बचावासाठी इतर गावकरी धावले आणि त्यांनी दगड आणि काठ्यांनी अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गावकरी आणि स्थानिकांच्या मदतीने अखेर अस्वलाला हुसकावून लावण्यात यश आलं.

या हल्ल्यात अरुण कुपसे आणि विजय कुपसे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी अरुण कुपसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं आहे.