सिंदेवाही:- नदीकाठी गेलेल्या युवकाचा १६ ऑगस्ट रोजी तोल गेल्याने तो नदीत बुडाला. परंतू दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतरही त्याचा मृतदेह हाती आला नाही, सोमवार १८ ऑगस्ट रोजी तब्बल तीन दिवसांनी मूल तालूक्यातील भादुर्णा गावाजवळील नदीत त्याचा मृतदेह आढळला. मृतकाचे नाव बबलू राम मांदाळे (२५) असे असून तो तालूक्यातील वाकल येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार बबलू रामभाऊ मांदाळे हा तरुण शनिवारी ४ वाजताच्या दरम्यान शेताकडे गेला होता. त्याचे शेत वाकल येथील नदीला लागून असल्याने बबलूचा तोल गेला व पाय घसरून तो नदीत पडला असल्याचे ग्रामस्थ नागरिक सांगत आहेत. सिंदेवाही पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चंद्रपूर येथून रेस्क्यू टीमला बोलविण्यात आले. मात्र, काल रात्री उशिरापर्यंतही बबलूचा मृतदेह मिळाला नव्हता. सोमवारी सकाळी मूल तालुक्यातील भादूर्णी गावाजवळ नदीच्या काठावर बबलू मांदाळे यांचा मृतदेह आढळून आला.
ही माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पीएसआय विनोद बावणे, पीएसआय भूषण पाटील हे भादूर्णी येथील नदीवर पोहचून रेस्क्यू टीमच्या मदतीने शव नदीबाहेर काढले. पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले. पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.