चंद्रपूर:-मुल तालुक्यातील पोलिस ठाणे हद्दीत दि. २९ जुन २०२५ ला एका युवकाने एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, महिनाभरापासून आरोपी फरार आहे
सविस्तर वृत्त असे की, अल्पवयीन पीडित मुलीचे आई-वडील घरी नसल्याचे पाहून आरोपी निशिगंध जपान उराडे (वय 40 वर्षे) याने बळजबरीने घरात घुसून मुलीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता मुलीने आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७५ (२), ३३२ (क), ३५१ (२) सह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
लेखी तकार पिडीतीचे आईने १ महिन्यापुर्वी पोलीस स्टेशन मुल जिल्हा चंद्रपुर येथे केली असुन अजुनही पोलीसांनी आरोपीला अटक केलेली नाही. व आरोपी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असुन पिडीतीच्या आई-वडीलांना धमकी देत आहे. तसेच पिडीतीच्या जीवाला सुध्दा धोका निर्माण झालेला आहे. असा आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेत नभा वाघमारे यांनी केला आहे.
आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. जर आरोपीवर येत्या 8 दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास पिडीतीच्या आई-वडीलांना पकडून पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) जिल्हा चंद्रपुरच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) जिल्हा चंद्रपुरच्या वतीने इशारा दिला आहे.